पुणेकरांनो, दहीहंडी बघायला जाताय ? उद्या शहरातील हे रस्ते असणार बंद
दहीहंडी हा सण उद्या पुण्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. दहीहंडी पाहण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर हजारोंची गर्दी उसळणार असल्याची शक्यता आहे. विशेषतः शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी ५ वाजल्यापासून दहीहंडी फुटेपर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौ, मंडई चौक (बाबु गेणु चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इ. ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे उद्या पुण्यातील काही रस्ते ठराविक काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे असतील वाहतूकीतील बदल !
>>शिवाजीरोड वरुन स्वारगेटला जाणेकरीता :- स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक - पुढे टिळकरोडने / शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.
>>पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाणेकरीता :- पुरम चौकातुन टिळक रोडने अलका टॉकीज - चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच पुरम चौकातुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील.
>>स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणेकरीता :- स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जातील.
>>बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
>>रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असुन पर्यायी मार्गाचा वापर करावा.
>>सोन्या मारुती चौकाकडुन लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातुन उजवीकडे वळुन फडके हौद चौकातुन इच्छित स्थळी जातील.
>>शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलकडे जाणारी वाहतूक हि गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.
>>गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक हि दारुवाला पुल येथुन बंद राहिल. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.
वीर गोगादेव मुख्य मिरवणूक मार्ग
उद्या सायंकाळी ४ वाजता लष्कर वाहतुक विभागातील न्यु मोदीखाना येथुन मिरवणुकीस सुरुवात होवुन न्यु मोदीखाना पुलगेट पोलीस चौकी मेढी माता मंदीर महात्मा गांधी रोडने डावीकडे वळुन कुरेशी - मस्जिद समोरुन सेंटर स्ट्रीट रोडने सरळ भोपळे चौक सेंटर स्ट्रीट चौकी उजवीकडे वळुन महावीर चौकातून डावीकडे वळुन महात्मा गांधी रोडने कोहिनुर हॉटेल चौक ते पुलगेट पोलीस चौकी मेढी माता मंदीर येथे विसर्जन होणार आहे. त्यामुळे काही मार्ग बंद राहणार आहेत.
मिरवणूक सुरु झालेनंतर बंद करण्यात येणारे मार्ग व पर्यायी मार्ग -
>>गोळीबार मैदान चौकातून वाय जंक्शनमार्गे ( पंडोल अपार्टमेंट) महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतुक ही वाय जंक्शन (पंडोल अपार्टमेंट) येथे बंद करुन ती खाणे मारुती चौक येथे वळविण्यात येणार आहे. तसेच सोलापूर रोडला जाणारी वाहतुक ही खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळून जाईल व शहरात येणारी वाहतुक ही खाणे मारुती चौकातून सरळ ईस्ट स्ट्रिट रोडने इंदीरा गांधी चौकातून डावीकडे वळून महावीर चौक व तेथून पुढे एम जी रोडकडे जाईल किंवा इंदिरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलीस स्टेशन चौक व तेथून डावीकडे वळून तीन तोफा चौकातून इच्छित स्थळी जाईल.
>>मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतुक बंद करुन सदरची वाहतुक ही चुडामन तालिमकडे वळविणेत येईल.
>>व्होल्गा चौकाकडून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदर वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रिटने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
>>महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक एम जी रोडने नाझ चौकाकडे वळविण्यात येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.