मृत पोलीसाचे पुण्यात अवयव दान, नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला मृत पोलिसांच्या कुटूंबीयांनी माणुसकीचा आदर्श ठेवला होता. अपघात गंभीर जखमी झाल्यानंतर अर्धा तास कोणतीही मदत न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, मृत पोलिसांचे अवयव दान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
राजेश कौशल्य असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड येथे त्यांच्या अपघात झाला होता. अपघातानंतर राजेश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र, जवळ-जवळ अर्धातास कोणत्याही वाहन धारकाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे माणुसकीच जखमी झाली की काय? असा सवाल उपस्थित होत होता.
अपघाताच्या अर्ध्यातासानंतर राजेश यांना प्राथमिक उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १० दिवसांच्या उपचारानंतर रविवारी (दि. १३) रात्री त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर अखेर सोमवारी (दि. १४) सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता.
मात्र, राजेश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जखमी नसून जिवंत असल्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले होता. मृत पोलिस कर्मचारी राजेश कौशल्य यांचे अवयव दान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले होते. राजेश यांचे ह्रदय दान करण्यात आले होते. हे ह्रदय एका आर्मी रुग्णालयाला आणि खासगी रुग्णालयाला दान करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह नांदेड येथे नेण्यात आला. काल राजेश यांच्यावर नांदेड येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.