स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नवा आदर्श, मृत पोलीसाचे अवयव आर्मी रुग्णालयाला दान

राजेश कौशल्य असे अवयव दान करणाऱ्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड येथे त्यांच्या अपघात झाला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 14 Aug 2023
  • 08:21 pm
Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला माणुसकीचा नवा आदर्श, मृत पोलीसाच्या अवयव दानाने आर्मी जवानाला नवसंजीवनी

स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नवा आदर्श, मृत पोलीसाचे अवयव आर्मी रुग्णालयाला दान

मृत पोलीस कर्मचारी अपघातानंतर पडले होते रक्ताच्या थारोळ्यात

स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला मृत पोलिसांच्या कुटूंबीयांनी माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. अपघात गंभीर जखमी झाल्यानंतर अर्धा तास कोणतीही मदत न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे माणुसकी जखमी झाली की काय ? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, मृत पोलिसांचे अवयव दान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

राजेश कौशल्य असे अवयव दान करणाऱ्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड येथे त्यांच्या अपघात झाला होता. अपघातानंतर राजेश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र, जवळ-जवळ अर्धातास कोणत्याही वाहन धारकाने त्यांच्याकडे लक्ष दिले आहे. शिवाय, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे माणुसकीच जखमी झाली की काय? असा सवाल उपस्थित होत होता.

अपघाताच्या अर्ध्यातासानंतर राजेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या उपचारानंतर रविवारी रात्री त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर अखेर आज (सोमवारी) सकाळी त्यांची मृत्यूची झुंज अयशस्वी ठरली.

मात्र, राजेश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जखमी नसून जिवंत असल्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले आहे. मृत पोलिस कर्मचारी राजेश कौशल्य यांचे अवयव दान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. राजेश यांचे ह्रदय दान करण्यात आले आहे. हे ह्रदय एका आर्मी रुग्णालयाला आणि खासगी रुग्णालयाला दान करण्यात आले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यांच्या पुर्वसंध्येला मृत पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवा आदर्श ठेवला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest