दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने बोनसची बिले चुकवली; बोनस मिळण्यास लागणार उशिर
पुणे : दिवाळी अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना (PMC News) दिवाळी बोनस (Diwali Bonas) १ नोव्हेंबरला मिळणार होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजन पडले असून (Pune News) त्यांचा बोनसला उशिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका कर्मचार्यांच्या बोनसची बीले चुकली असल्यामुळे पुन्हा बिले करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यामुळे १ तारेखाला जमा होणारा बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालाच नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात कर्मचार्यांना बोनस मिळू शकेल असे महापालिका प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या आठ हजार कर्मचार्यांना १ नोव्हेंबरला बोनस दिला जाईल असे महापालिका आयुक्त यांनी जाहिर केले होते. महापालिका प्रशासनाने त्यांचे काम देखील सुरु केले. पालिकेतील कर्मचार्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे बीले देणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाने बीले ही ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे केली. त्यामुळे कर्मचार्यांना १० ते १५ हजार रुपये बोनस कमी मिळणार होता. महापालिका प्रशासनाच्या लक्षात शेवटच्या टप्यात ही गोष्ट आल्यामुळे आता नव्याने बीले करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
बोनसची बीले चुकली असल्यामुळे मागिल आठवड्यामध्ये नवीन बीले करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. उशिरापर्यंत थांबून बिले तयार करण्यात येत आहे. येत्या आठवडयाभरात सर्व कर्मचार्यांना बोनस मिळेल.
- उल्का कळसकर, मुख्य लेखापाल, महापालिका