पुणे विद्यापीठाला एनएसयुआयचा विद्यार्थ्यांसोबत घेराव
अमरावती विद्यापीठाच्या तसेच MSBTE च्या बाबतीत जो निर्णय घेण्यात आला तोच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑनचा निर्णय लागु करण्यात यावा, यासाठी एनएसयुआयचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धडक मोर्चा काढण्यात आला.
विद्यापीठात इंजीनियरिंग करणाऱ्या साधारण २५००० पेक्षा ही जास्त विद्यार्थ्यांवर एक संपूर्ण वर्ष वाया जाण्याची वेळ आलेली आहे. वेळापत्रक, पेपर तपासणी, पेपर सेटिंग, निकालातल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार उभी राहिलेली आहे. त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी MSBTE च्या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यासाठी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पुणे विद्यापीठाने सुद्धा तोच निर्णय लागू करून हजारो मुलांना द्यावी आणि त्यांचे एक वर्ष वाया जाण्यापासून रोखावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन म्हणाले, एक महिन्यापासून आम्ही सतत विद्यापीठात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करत आहोत व प्रशासनासोबत संपर्कात आहोत. आम्हाला वारंवार लवकरच यावर समितीतर्फे निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा केवळ एक वर्ष वाया जाणार असे नाही. त्यासोबत आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहे. अमरावती विद्यापीठ जर मागणी मान्य करू शकतो तर पुणे विद्यापीठात ही मागणी मान्य करायला इतका वेळ का? प्र-कुलगुरूच्या बाबतीत ज्या घाईगडबडीत प्रशासनाने निर्णय घेतला तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुणे विद्यापीठ यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही बेमुदत उपोषणावर बसू, असा असा इशारा जैन यांनी दिला.
रोनक खाबे सर म्हणाले या मागणी साठी आज तिसरा आंदोलन करण्यात आले आहे, परंतू निर्णय होत नाही. इतके आडमुठेपणा प्रशासन का करतोय, हे कळत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.