आता मुंबई-पुणे प्रवास होणार अर्धा तास सोपा, मिसिंग लिंकचे काम ८० टक्के पुर्ण
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मिसिंग लिंकची उभारणी करण्यात आली आहे. या लिंकच पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर 2024 असून प्रवाशांना यावरून प्रवास करता येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
लोणावळा ते खालापूर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी दादा भुसे यांनी आज केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सध्या लोणावळा ते खालापूर हे अंतर 19 किलोमीटर इतके आहे. या प्रवासादरम्यान बोरघाटात होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ही कोंडी या मिसिंग लिंकमुळं फुटेल असा विश्वास सरकारला आहे.
सोबतच प्रस्तावित मार्गाने सहा किलोमीटरची आणि किमान अर्धा तासाची बचत होणार आहे. एकूण 13 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे आणि दोन पूल उभारले जातायेत. पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडण्यासाठी महत्वाचा ठरणारा मिसिंग लिंक सप्टेंबरमध्ये खुला होईल. प्रत्यक्षात याची पाहणी केल्यावर दादा भुसेंनी असा दावा केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.