राष्ट्रवादीची मणिपूर आपत्तीग्रस्तांसाठीची मदत राज्यपालांकडे सुपूर्द
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मणिपूर येथील आपत्तीग्रस्तांसाठीना मदत देण्यात आली आहे. ही मदत मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया ऊईके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यामध्ये विविध जीवनावश्यक वस्तू, सुमारे एक टेम्पो धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धीरज शर्मा यांनी राज्यपाल अनुसुया ऊईके यांची भेट घेतली.
यावेळी मणिपूरच्या राज्यपालांकडे मागणी करत असताना, "छावणीमधील नागरिकांना लवकरात लवकर त्यांची घरे बांधून देण्यात यावी व त्यांना राहण्यायोग्य सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यावे, मुलांच्या शाळा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या. तसेच मुलांच्या शाळांची संपूर्ण फी सरकारने भरावी", अश्या मागण्यांचे निवेदन दिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.