मूर्ती लहान पण.... आठवीच्या विद्यार्थ्याची 'आयडियाची कल्पना'
पुणे : समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) होणारे अपघात हे मुख्यत्वे करून रात्रीच्या वेळी चालकाचे गाडीवरून सुटलेले नियंत्रण, चालकाची झोप पूर्ण न होणे, चालकाला डुलकी लागणे (Accident) या कारणामुळे झाले आहेत. या गोष्टीचा विचार करुन इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने भन्नाट शक्कल लढवली आहे. चालकाला डुलकी लागल्यास अलर्ट देणाऱ्या गॉगलची त्याने निर्मिती केली आहे. (New idea)
आयुष घोलप असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील या मुलाने आगळ्यावेगळ्या गॉगल प्रयोगाची चर्चा सर्वत्र होत असून त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी नागपूर शिर्डी यासह अनेक शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरू झाला. जेव्हापासून समृध्दी महामार्ग तयार झाला आहे, तेव्हापासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत यात अनेक जण मयत व जखमी झाले आहेत.
रात्रीच्या वेळी लांबच्या प्रवासाला निघालेले वाहन चालक यांना डूकली लागल्यास अपघात होतात. याच अपघातास आळा बसावा यासाठी आंबेगाव तालुक्यातील चास येथील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांने वाहन चालकाने डोळे झाकल्यास त्याला अलर्ट करणारा सेन्सर गॉगल विकसित केला आहे. अवसरी खुर्द येथील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणारा आयुष घोलप या विद्यार्थ्याने हा चमत्कार केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.