PMC News : मिळकतकराच्या थकबाकीत महापालिका करणार तडजोड; लोकअदालतमध्ये सहभागी होण्याचे मिळकत धारकांना आवाहन

महापालिकेने (PMC) मिळकतकराची थकबाकी वसुल (income tax Recovery ) होण्यासाठी ९ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकआदालतीमध्ये (Lokadalat) थकबाकीदारांनी सहभागी व्हावे, यावेळी थकबाकी बाबत महापालिकेकडून जडतोड केली जाईल

PMC News

मिळकतकराच्या थकबाकीत महापालिका करणार तडजोड

पुणे : महापालिकेने (PMC) मिळकतकराची थकबाकी वसुल (income tax Recovery ) होण्यासाठी ९ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकआदालतीमध्ये (Lokadalat)  थकबाकीदारांनी सहभागी व्हावे, यावेळी थकबाकी बाबत महापालिकेकडून जडतोड केली जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार(Vikram Kumar) यांनी सांगितले0 (Pmc News)  

मिळकत कर वसूलीसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. काही करुन महापालिकेला मिळकत कर जमा करण्याचे ध्येय साध्य करायचे आहे. त्यासाठी महापालिकेकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींवर मिळकतकर विभागाकडून कर आकारणी केली जाते. या मिळकतींचा कर १ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान भरणार्‍यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम २५ हजारांपेक्षा कमी आहे. अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १० टक्के सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम २५ हजार १ रूपयांपेक्षा जास्त असणार्‍या मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५ टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. त्यानंतर महापालिकेकडून धकबाकी वसुलीसाठी कडक कारवाईची मोहिम राबवली जात आहे. महापालिकेकडून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त केल्या जात आहेत असे असले तरी थकबाकीदारांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या मिळकतकर विभागाची २८०० कोटीच्या घरात सर्वसाधारण मिळकत कराची थकबाकी आहे. तर २५०० कोटीच्या घरात व्यवसायिक मिळकतींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल होण्यासाठी महापालिकेने ९ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या अदालतीमध्ये मुळ कर कमी होणार नाही, मात्र थकबाकीवर लावण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेवर तडजोड होणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिकेने १२७ कोटीं रुपयांची थकबाकी असलेल्या २०३४ मिळकती पालिकेने सील केल्या आहेत. तर त्यापैकी व्यावसायिक २०३ मिळकतींचा लिलाव केला जाणार असून लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. मिळकत कर थकबाकी वसुलीकरीता मिळकत कर विभागाने प्रयत्न सुरु ठेवले आहे. गेल्यावर्षी काही निवासी मिळकती महापालिकेने सील करून त्यांचा लिलाव केला होता. यावर्षी महापालिकेने थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक मिळकतींवर लक्ष केंद्रीत केले आहे. आजपर्यंत सुमारे २ हजार ३४ व्यावसायिक मिळकतींकडे एकुण १२७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी २०३ मिळकतींचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीया सुरु केली आहे. हा लिलाव करण्यासाठी महापालिकेला या मिळकतींवर बोजा चढवावा लागणार आहे. ही कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी महापालिकेच्या विधी सल्लागार विभागाचे पाच वकिल नियुक्त केले आहे. हे वकिल प्रत्येक प्रकरण तपासून प्रस्ताव तयार करून मिळकत कर विभागाला पाठवित आहेत.

महापालिकेला सदर मिळकतीचा लिलाव करायचा असल्यास त्या मिळकतीवर बोजा चढविणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टी कार्डच्या सीटीसर्व्हेनंबरवर थकबाकीदाराच्या नावाची नोंद हवी असते. ही तांत्रिक अडचण दुर करुन त्यातून मार्ग काढला जात आहे.

महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्यास सुरुवात केल्यानंतर पहील्या टप्प्यात ८४ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या १८९ मिळकती सील केल्या गेल्या. दुसऱ्या टप्प्यात १० कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या ७९ मिळकती सील करण्यात आल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest