महापालिका प्रशासन मराठी भाषेविषयी उदासीन, स्थायी समितीच्या प्रस्तावात इंग्रजी अक्षरांचा भरणा
पुणे : राज्यात मराठीत बोलले पाहिजे. तसेच प्रशासनाचा कारभार देखील मराठी भाषेत असायला हवा. असे फक्त बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र इंग्रजी शब्दांचा भरणा केला जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्थायी समितीला प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यामध्ये चक्का मराठी अक्षरांचा वापर न करता इंग्रजी अक्षरांचा वापर करुन मराठी लिहण्याचे पराक्रम करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय कामात मराठीच्या वापराविषयी महापालिका उदासिन असल्याचे समोर आले आहे.
राज्याचा कारभार मराठी भाषेत झाला पाहिजे असा आग्रह धरला जातो. नुकताच न्यायालयाचे आदेशाने दुकांनावरील पाट्या या मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे. मराठी भाषा उध्दार व्हावा, यासाठी सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. तसेच यावरुन अनेकवेळा राजकारण देखील करण्यात येते. असे असताना प्रत्यक्ष पुणे महापालिकेच्या शासकीय कामात मराठीची अवहेलनाच होत असल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या प्रस्तावांमध्ये सरळ इंग्रजीचा वापर सर्रास होताना दिसतो. मात्र इंग्रजीचा वापर करत असताना चुकीच्या पध्दतीने मराठी लिहली जात आहे. अभियंत्यापासून आयुक्तांपर्यंत हा प्रस्ताव सर्वांकडे जातो. मात्र अशा चुका कोणाच्याच लक्षात येत नाहीत. पाणी पुरवठा विभागाचे नवी होळकर जलशुध्दीकरण केंद्राचे एक निविदा नुकतीच मान्य झाली. या निविदेच्या विषयपत्रामध्ये 40 चङऊ झीरींळवळप घरीहाींशलहश छर्रींळप केळश्रज्ञरी गरश्रीर्हीवहळज्ञरीप घशपवीर ढळप तरीीहरपज्ञरीळींर उहरर्श्रींळपश अशा प्रकारे मराठी लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये अनेक वेळे इंग्रजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन मराठी भाषेविषयी किती उदासीन आहे. यावरुन स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे असे अनेक प्रस्तावामध्ये चुकीच्या पध्दतीने मराठी भाषा लिहली जात आहे.
महापालिकेची मराठी भाषा समिती तरीही..
मराठी भाषेचा नागरिकांमध्ये प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी एकीककडे महापालिकेची मराठी भाषा समिती आहे. मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी ही समिती काम करते. मराठी साहित्यासाठी पुरस्कार महापालिका देत असताना स्वत: मात्र मराठी भाषेचा अवमान करत असल्याचे समोर आले आहे.