बारामतीतील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग, ८० लाखाचे नुकसान
पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग मध्यरात्री रात्री दोनच्या सुमारास लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत जवळपास ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागली. आगेची माहिती मिळताच बारामतीनगर परिषदेसह एमआयडीसी, छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आदींच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होईन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत कचरा वर्गीकरण करणारी यंत्रणा आणि कचरा जळून खाक झाला आहे.
आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय नगरपालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. कचरा डेपोमध्ये आग लागण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसताना अचानक मोठ्या प्रमाणात लागली ही बाब संशयास्पद असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.