माळशेज घाटात दरड कोसळली
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी सकाळी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात या महामार्गावर राडारोडा आला आहे. त्यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
माळशेज घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज सकाळच्या सुमारास दरड कोसळली आहे. यावेळी येथून जात असलेल्या टेम्पोचे थोडे नुकसान झाले. टेम्पो चालक टेम्पो रस्त्यावर सोडून घाबरून पळून गेल्याची माहिती वाहन चालकांकडून मिळाली. त्यामुळे येथे एकेरी वाहतुक सुरू झाली आहे.
वाहन चालकांनी माळशेज घाटात प्रवास करताना कोठे ही विनाकारण वाहन उभे करू नये. तसेच धुक्यामध्ये लाईट लावून शक्यतो समुहाने एका मागे एक गाड्या पास कराव्या असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.