'द केरळ स्टोरी' राज्यात करमुक्त करा
दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुळीक यांनी पत्र पाठवले आहे.
या पत्रात मुळीक म्हणाले की, “हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून वास्तव दाखविणारा आहे. केरळमधील ३२ हजार मुली अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून 'इसिस' या दहशतवादी संघटनेत सामील केले गेले, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.”
“या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा ज्यामुळे तो अधिकाधिक नागरिकांना पाहाता येईल”, अशी मागणी मुळीक यांनी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.