‘कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही’, जरांगे पाटलांचा राजगुरूनगरमध्ये एल्गार
‘मराठा समाजाने आरक्षणासाठी फार मोठा लढा दिला आहे. अनेकांचे यासाठी बलिदान गेले आहे. मराठा समाजाला पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको’, कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटलांची भव्य सभा होत आहे. या सभेत ते बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले की, “मला जर माझ्या समाजाशी गद्दारी करायची असती तर ती मी करू शकलो असतो मात्र ज्या समाजाला मी माझे मायबाप मानले त्यांच्याशी मी गद्दारी करू शकत नाही. मंत्री भेटायला आल्यानंतर त्यांनी मला कोपऱ्यात चला असे म्हंटले होते. मात्र मी त्यांना जे बोलायचे आहे. ते व्यासपीठालरच बोला. मराठा समाजातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही.”
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “मराठ्यांनो उद्यापासून कामाला लागा. प्रत्येक मराठ्यांच्या घरी जाऊन आरक्षण कशासाठी पाहिजे आहे ते प्रत्त्येकाला समजावून सांगायचे आहे. याशिवाय कोणीही आत्महत्त्या करायची नाही आणि कुठलाही उद्रेक करायचा नाही. मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले परंतु लेकरांच्या वाट्याला हे नको. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठा आरक्षण समाजाने समजून घेण गरजेचं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळ एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.