कार ५० फुट खोल दरीत कोसळली, तीन जण जखमी
भरधाव कार भीमा नदीवरील पुलाजवळ रस्त्यावरून घसरून सुमारे ५० फूट खाली दरीत कोसळली घटना घटना घडली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-अहमदनगर रस्त्यावर कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवरजवळ घडला आहे.
अनिकेश सिंघल (वय ३०) आणि ऋषिकेश यादव (वय ३४) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर राजा विनायक सिंग (वय ३९) हे किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवाशी पुण्यावरून अहमदनगरच्या दिशेने जात होते. भीमा नदीजवळ कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे पलटी होऊन सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघातानंतर कारमधील एक व्यक्ती आत अडकला होती. स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी कारचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.