दहाव्याच्या कार्यक्रमाला निघाले अन् अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरातील इस्कॉन मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. दोघेही दहाव्याच्या कार्यक्रमाला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय ५०) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी MH12 VH 9789 या होंडा एक्टिवा गाडीवरून जात होते. कोंढव्यातील इस्कॉन मंदिराजवळील RMD शाळेसमोर आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळातच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. हे दोघेही बाणेर गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती व तपास कोंढवा पोलीस करत आहेत.