Kएनआयबीएम रोडवरील भंगाराच्या दुकानाला भीषण आग
पुण्यात कोंढवा परिसरात भीषण आग लागली आहे. कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील कौसरबाग परिसरातील विजय पार्क सोसायटीजवळील गॅरेज आणि भंगार विक्रेत्याच्या दुकानाला आग लागली आहे. आज (शनिवारी) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग एवढी भीषण होती की आगीचे धुर लांबपर्यंत दिसून येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या कोणी जखमी झाले आहे का किंवा जीवितहानी झाली आहे का ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.