पुणे जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीनसह विविध पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी

बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी मुंबई यांना जारी केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 8 Sep 2023
  • 07:22 pm
Pune district : पुणे जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीनसह विविध पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीनसह विविध पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी

प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी मुंबई यांना जारी केले आहेत.

तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील ३-४ आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २०  टक्क्यापेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २०  टक्क्यापेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या २५  टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव) व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर, परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधीक सूचकांच्या (प्रॉक्सी इंडिकेटर) आधारे नुकसान भरपाईबाबत अधिसूचना निर्गमित करण्याची तरतूद आहे.

पावसातील ३-४ आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, आणि पर्जन्यातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २०  टक्क्यापेक्षा जास्त तफावत) या प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या पिकाचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सदर महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५  टक्के आगाऊ रक्कम १ महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीक, तालुका आणि सरासरीच्या उत्पादनाच्या ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेले अधिसूचित महसूल मंडळ व मंडळ गट पुढीलप्रमाणे:

बाजरी: हवेली- कळस, भोसरी, वाघोली, मोशी, खराडी, लोणीकंद, हडपसर, उरुळीकांचन, थेऊर, उरुळीदेवाची, मोहम्मदवाडी, फुरसुंगी, अष्टापूर, लोणीकाळभोर, आंबेगाव तालुका- पारगाव, निरगुडसर, शिरूर तालुका- शिरुर, रांजणगाव गणपती, निमोणे, टाकळीहाजी, मलठण, पाबळ, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, न्हावरा, वडगाव रासाई, इंदापूर तालुका- इंदापूर, लोणीदेवकर, बावडा, पळसदेव, लाखेवाडी, माळवाडी, निमगाव केतकी, काटी, अंथुर्णे, भिगवण, लासुर्णे, सणसर, दौंड तालुका- दौंड, देऊळगाव राजे, रावणगाव, गिरीम, केडगाव, वरवंड, पाटस, बोरीपारधी, यवत, बोरीभडक, खामगाव, राहू, कुरकुंभ, वडगाव बांडे, पुरंदर- सासवड, भिवडी, राजेवाडी, जेजुरी, कुंभारवळण, शिवरी, परिंचे, वाल्हा.

कांदा: पुरंदर तालुका गट, इंदापूर तालुका गट, बारामती तालुका गट, दौंड तालुका गट

सोयाबीन: जुन्नर तालुका- जुन्नर, राजूर, आपटाळे, ओतूर, मढ, वडगाव आनंद, डिंगोरे, नारायणगाव, वेल्हा, निमगाव सावा, वडज, ओझर, आंबेगाव तालुका- घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, पारगाव, निरगुडसर, खेड तालुका गट, बारामती तालुका गट, इंदापूर तालुका गट.

तूर: शिरुर तालुका- शिरुर, रांजणगाव गणपती, टाकळी हाजी, मलठण, निमोणे, पाबळ, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, न्हावरा, वडगाव रासाई, बारामती तालुका- बारामती, उंडवडी क.प., काटेवाडी, माळेगाव, पणदरे, वडगाव निं., शिर्सुफळ, सुपा, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल, इंदापूर तालुका- इंदापूर, लोणीदेवकर, बावडा, सणसर, निमगाव केतकी, काटी, अंथुर्णे, भिगवण, पळसदेव, लाखेवाडी, माळवाडी, लासुर्णे.

भुईमूग: हवेली- खेडशिवापूर, खडकवासला, कोथरुड, चिंचवड, कोंढवा, आंबेगाव बु., धायरी, डोणजे, खानापूर, शिवणे, कोंढवे धावडे, निगडे, देहू, कळस, भोसरी, वाघोली, मोशी, खराडी, लोणीकंद, हडपसर, उरुळीकांचन, थेऊर, उरुळीदेवाची, मोहम्मदवाडी, फुरसुंगी, अष्टापूर, लोणीकाळभोर, खेड तालुका- राजगुरुनगर, कान्हेरसर, वाडा, कुडे बु., करंजविहीरे, कडूस, पाईट, वेताळे, चाकण, पिंपळगाव त. खेड, आळंदी, आंबेगाव तालुका- घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, पारगाव, निरगुडसर, बारामती तालुका- बारामती, उंडवडी क.प., काटेवाडी, माळेगाव, पणदरे, वडगाव निं., शिर्सुफळ, सुपा, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल, पुरंदर तालुका- सासवड, भिवडी, राजेवाडी, जेजुरी, कुंभारवळण, शिवरी, परिंचे, वाल्हा आणि जुन्नर तालुका गट.

पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest