संग्रहित छायाचित्र
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉपरेरेशनची (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट आरक्षण सेवा सोमवारी रात्रीपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या १० तासांपासून तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तिकीट काढताना पैसे कापले जात आहेत. मात्र, बुकिंग होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
सोमवारी संध्याकाळी ९ वाजेपासून आयआरसीटीसीचे संकेतस्थळ स्लो होत गेले. त्यानंतर काही वेळाने त्यावरून तिकीट काढणे अशक्य झाले आहे. संकेतस्थळावर जाऊन प्रवाशांनी तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक कामांसाठी बंद असल्याचे दाखवत होते. या संदर्भात आयआरसीटीसीतर्फे सव्र्हरमध्ये बिघाड झाला असून त्यावर काम सुरू आहे. तरी लवकरच सुविधा पूर्ववत होईल असे सांगण्यात येत आहे.
Due to technical reasons the ticketing service is not available. Our technical team is resolving the issue. We will notify as soon as the technical issue is fixed.
— IRCTC (@IRCTCofficial) July 25, 2023
यासंदर्भात IRCTC ने ट्विट करत म्हटले आहे, सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले आहे. IRCTC ने म्हटले आहे, "तांत्रीक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची टेक्निकल टीम या समस्येत सुधारणा करत आहे. तांत्रिक समस्या व्यवस्थित होताच आम्ही आपल्याला माहिती देऊ."
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.