रोहन सुरवसे पाटील
पुण्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना पदावरून काढून त्यांच्या सर्व कार्यकाळाची चौकशी करावी, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
सुरवसे पाटील म्हणाले की, “नोंदनी उपमहानिरीक्षक मुख्यालय पुणे येथील डीआयजी उदयराज चव्हाण हे पालघर जेडीआर असताना त्यांच्या कार्यकाळात वसई विरार येथे बोगस दस्त झाल्याचे रॅकेट गेल्या चार दिवसांपूर्वी उघडकीस आले आहे. तसेच यापूर्वी मौजे आल्याळी येथील गुरुचरण जमिनीचे दस्त बाबत तक्रार झाली होती. याबाबत ही उदयराज चव्हाण यांना निलंबित का केले नाही? व उदयराज चव्हाण हे ठाणे शहरचे जेडीआर असलेवेळी कल्याण डोंबिवली येथील 27 गावाच्या अनाधिकृत प्रश्न असताना बांधकामाबाबत गंभीर विषय होता आणि हजारो बोगस दस्त नोंदवण्यात आले व गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक केली.”
“तसेच उदयराज चव्हाण यांच्या आशीर्वादाने बोगस दस्त नोंदणी झाली. या प्रकरणाची चौकशी का होत नाही? मबई येथे स्टॅम्प बुडविल्या प्रकरणी निलंबित होऊन देखील अशा वादग्रस्त अधिकाऱ्याला नोंदणी विभागातील सर्वोच्च पदावर बसविण्यात येण्यामागचे कारण काय?” असा सवाल रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे.
“डीआयजी उदयराज चव्हाण यांना पदावरून काढून त्यांच्या सर्व कार्यकाळाची चौकशी करावी कारण जनता सुज्ञ आहे. जनता उघड्या डोळ्यांनी सर्वकाही पाहत आहे. जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी संबंधित वरिष्ठांनी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल”, असा इशारा रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.