घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, २० लाखाचा मुद्देमाल जप्त

पुण्यात ऑनलाइन बिंगो अप्लिकेशनचा वापर करून जुगार खेळणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 11 May 2023
  • 05:18 pm

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, २० लाखाचा मुद्देमाल जप्त

मार्च २०२३ मध्ये ४० लाखाची केली होती चोरी

पुण्यात ऑनलाइन बिंगो अप्लिकेशनचा वापर करून जुगार खेळणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

मुकेश बबन मुने (वय २६) आणि सुरेश बागडे (वय ३२, रा. कवडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील घोरपडी येथील सोपानबाग सोसायटीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना मार्च २०२३ मध्ये आरोपी मुकेशने एका ५८ वर्षीय व्यक्तीच्या घरातील कपाटाचे डिजीटल लॉकर उघडुन त्यातील सोने, चांदी, हिऱ्याचे दागीने आणि फॉरेन करन्सी असा एकुण ४० लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा ५ आणि गुन्हे शाखा यांच्याकडून तपास सुरू करण्यात आला. यावेळी पुणे शहरातील १०० हून अधिक ज्ञात गुन्हेगारांचा तपास करण्यात आला. मात्र, आरोपीचा पत्ता पोलीसांना सापडत नव्हता. अखेर या चोरीमागे ऑन रेकॉर्ड गुन्हेगार मुकेश बबनचा हात असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याबद्दलची अधिकची माहिती काढली असता तो आपला मित्र नितीनसोबत भिवंडीत गेल्याचे उघड झाले. मात्र, भिवंडीतील शोधमोहिमेदरम्यान मुकेश आणि त्याचा साथीदार नितीन पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना दोघांनाही पुण्यातील खराडी बायपास येथून अटक केली.

दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती मुकेशने चोरलेले सोने नितीनने अहमदनगर येथील एका सोनार असलेल्या मित्राला विकल्याची कबूली दिली. आरोपींनी कबूली देताच दोघांनाही अटक करून पोलीसांनी अहमदनगर येथे जाऊन ४२ हजार रुपये किमतीचे मोत्यांचे दागिने व पुष्कराज खडे, १६ लाख रुपये किमतीचे ३२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि तसेच ४ लाख ५० हजारांचे विदेशी चलन असा एकूण २० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest