पीएमपीएमएलकडून आणखी दोन नव्या बस मार्गांचे उद्घाटन
पुणे शहरातील प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. प्रवाशी संख्येबरोबरच बस मार्गांचा विस्ताव तसेच नवीन बस सुरू करण्याची मागणी देखील पुणेकरांकडून केली जात होते. अशातच पुणे महानगर परिवहन महामंडळकडून (पीएमपीएमएल) आणखी दोन नव्या बस मार्गांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
पीएमपीएमएलव्दारे १४ जुलै रोजी चऱ्होली गांव ते वाकडेवाडी (मार्ग क्रमांक ११९ अ) आणि नीलज्योती सोसायटी ते स्वारगेट (मार्ग क्रमांक ८९) या दोन बहुप्रतिक्षित मार्गांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला.
या उद्घाटनाप्रसंगी पीएमपीएमएलच्या अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या निर्णयाने संबंधित भागातील नागरिकांचा प्रवास सुकर झाला आहे. प्रवाशांनी चऱ्होली गांव ते वाकडेवाडी आणि नीलज्योतील सोसायटी ते स्वारगेट या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.