पुण्यातील विस्तारीत मेट्रोमार्गांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या बारा किलोमीटरच्या विस्तारीत मेट्रो मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यात भूमिगत मेट्रो, गरवारे कॉलेज ते रुबी हॉल, आणि सिविल कोर्ट ते फुगेवाडी हे दोन मार्ग आजपासून सुरू झाले आहेत. आज दुपारनंतर पुणेकरांसाठी हे मार्ग सुरू झाले आहेत. या दोन्ही मार्गावरील तिकीटाचे दर काय असतील ? किती वाजता मेट्रो असणार आहे ? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात....
मेट्रोसाठी किती असणार तिकीट?
>वनाज ते रुबी हॉल - २५ रुपये
>वनाझ ते पुणे महापालिका - २०
>रुबी हॉल ते पिंपरी - ३०
>रुबी हॉल ते शिवाजी नगर - १५
>पिंपरी ते सिव्हील कोर्ट - ३०
>वनाज ते रेल्वे स्टेशन - २५
>रुबी हॉल ते डेक्कन – २५
तिकीट दरात सवलत किती मिळणार ?
>>विद्यार्थ्यांसाठी - ३० टक्के सवलत
>>शनिवार-रविवार सर्व नागरिकांसाठी - ३० टक्के सवलत
>>मेट्रो कार्ड धारकांसाठी - सरसकट १० टक्के सवलत
मेट्रोची वेळ कशी असेल?
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्टस (प्रवासाचा वेळ २० मिनिटे)
>सकाळी ७ ते ८ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
>सकाळी ८ ते ११ दरम्यान- दर १० मिनिटांनी एक ट्रेन
>सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
>दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान - दर १० मिनिटांनी एक ट्रेन
>रात्री ८ ते १० दरम्याना - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक (प्रवासाचा वेळ २० मिनिटे)
>सकाळी ७ ते ८ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
>सकाळी ८ ते ११ दरम्यान- दर १० मिनिटांनी एक ट्रेन
>सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
>दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान - दर १० मिनिटांनी एक ट्रेन
>रात्री ८ ते १० दरम्याना - दर १५ मिनिटांनी एक ट्रेन
अशी असतील पुणे मेट्रोची स्थानके
एक्वा लाईन
-दापोडी मेट्रो स्थानक (उन्नत)
-बोपोडी मेट्रो स्थानक (उन्नत)
-शिवाजीनगर मेट्रो स्थानक (भूमिगत
-सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक (भूमिगत)
पुणे मेट्रोच्या पर्पल लाईन व एक्वा लाईन या मार्गीकांवरील एकूण ११ स्थानकांचा मेट्रो सेवेत विस्तार होत असून ज्यामध्ये ९ उन्नत आणि २ भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.
— Pune Metro Rail (@metrorailpune) August 1, 2023
आज संध्याकाळी ५:०० वाजतानंतर ही स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो… pic.twitter.com/abBYQ8NHjk
पर्पल लाईन
-डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक (उन्नत)
-छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक (उन्नत )
-पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानक (उन्नत)
-सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक (उन्नत)
-मंगळवारपेठ मेट्रो स्थानक (उन्नत)
-पुणे रेल्वेस्टेशन मेट्रो स्थानक (उन्नत)
-रुबी हॉल मेट्रो स्थानक (उन्नत)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.