File Photo
गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे रस्त्यावर चांगलीच वाहतूक कोंडी होते. वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘पीएमपी’ प्रशासनाला बसच्या मार्गात बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पीएमपीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीचे आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी शहरात दुपारी आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक पोलीस प्रमुख रस्ते बंद करतात. त्यामुळे शहराच्या मध्य भागातून धावणाऱ्या पीएमपीच्या मार्गात बदल केला आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने मंगळवारी (दि. १९) याबाबतची अधिकृत घोषणा केली.
या बसचे मार्ग बदलले
मार्ग क्रमांक : ८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४ क, १४४ अ, २८३ मार्गात केलेला बदल : या बस ससून हॉस्पिटल, मालधक्का, जुना बाजार, महापालिका भवन बस स्थानक, काँग्रेस भवन, बालगंधर्व, डेक्कन बस स्थानक, खंडुजी बाबा चौक येथून पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.
मार्ग क्रमांक : ५५
मार्गात केलेला बदल : या मार्गावरून धावणाऱ्या बस शनिपार ऐवजी नटराज स्थानकावरून सुटतील. तसेच आंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलीस चौकी या मार्गावरून धावतील.
मार्ग क्रमांक : ९, १७४
मार्गात केलेला बदल : या बस पुणे स्टेशनवरून एनडीए कोंढवा गेट लक्ष्मी रस्ता वाहतुकीकरीता बंद केल्यास मॉडर्न बेकरी चौक येथे येऊन डाव्या बाजूस वळण घेत सेव्हन लव्हज चौकातून स्वारगेट चौकात येतील. स्वारगेट चौकातून सरळ नेहरू स्टेडियमवरून सारसबाग टिळक रस्तामार्गे डेक्कन कॉर्नर येथे जातील.
मार्ग क्रमांक : ७, १९७, २०२
मार्गात केलेला बदल : या मार्गावरच्या बस म्हात्रे पूलमार्गे स्वारगेट, शंकरशेठ रस्त्यावरून सेव्हन लव्हज चौक, रामोशी गेट, भवानीमाता मंदिर, महात्मा गांधी स्थानकापुढे नेहमीच्या मार्गाने जातील. जर भवानीमाता मंदिराजवळ रस्ता बंद असेल, तर गोळीबार मैदान, महात्मा गांधी स्थानकाच्या मार्गे वाहतूक सुरू राहील.
बसचा मार्ग क्रमांक : २, २ अ, ११, ११ अ, ११ क, २१६, २९८, ३५४, मेट्रो १२, १३, २०, २१, ३७, ३८, ८८, २९७, २८, ३०, १०
मार्गात केलेला बदल : छत्रपती शिवाजी रस्त्यावरून पीएमपीला प्रतिबंध केला आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पूलमार्गे टिळक रस्त्यावरून स्वारगेट चौकात बस जातील. टिळक रस्ता बंद केल्यानंतर शास्त्री रस्त्यावरून दांडेकर पूल मार्गे, लक्ष्मी नारायण चौक मार्गे स्वारगेटला पोचेल. स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बस या बाजीराव रस्त्यावरून धावतील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.