PMC : पुण्यात बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमांच्या फलकांनी व्यापले विद्युत खांब, कारवाई होणार ?

भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची माहिती देणारे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. या फलकांनी विद्युत खांब व्यापले आहेत.

PMC : पुण्यात बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमांच्या फलकांनी व्यापले विद्युत खांब, कारवाई होणार ?

पुण्यात बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमांच्या फलकांनी व्यापले विद्युत खांब, कारवाई होणार ?

महापालिका सर्व्हेक्षण करणार; अनधिकृत फलकांवर होणार कारवाई

पुणे : भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची माहिती देणारे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. या फलकांनी विद्युत खांब व्यापले आहेत. शहरात एवढ्या मोठ्या संख्येने फलक विनापरवाना फलक लावण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यावर महापालिका आयुक्तांनी फलक बेकायदेशीर असतील तर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाचे आयोजन जगदीश मुळीक फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी शहरात मोठे होर्डींग लावण्यात आले आहेत. त्यासोबतच शहरातील विद्युत खांबावर छोट्या आकाराचे जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांसाठी अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या माजी शहराध्यक्षावर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात विविध सण, समारंभ, वाढदिवस, लग्न सोहळे तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अनधिकृत फलक लावण्यात येतात. त्यावर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येते. शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी आकाश चिन्ह विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाते.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून शहरात कोणत्याही स्वरूपाची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम २०१३ तयार केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौक आदी ठिकाणी फ्लेक्स, बॅनर, फलक लावण्यास प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येत नाही. तरी सुध्दा शहरातील मोक्याच्या ठिकाणी, चौका-चौकांत, विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्तीनंतर अभिनंदनाचे, नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथीनिमित्त, विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावून जाहिरातबाजी केली जाते. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अतंर्गत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार यापूर्वी थेट नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता या बाबत महापालिका नेमके काय पावले उचलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान महापालिकेला या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी लावण्याक आलेल्या फलकांचे सर्व्हेक्षण करणार आहे. त्यात अनधिकृत फलक आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांमुळे शहराच्या सौदर्यास बाधा येते. अनधिकृत फलक लावण्यात आले असतील महापालिकेकडून नक्कीच कारवाई करण्यात येईल.

 - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त. 

जगदीश मुळीक फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे फलक लावण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव आला आहे. प्रस्तावात एकूण १०० शंभर फलक लावण्यासाठी परवानगी प्रस्ताव देण्यात आला आहे. फलक लावण्यासाठी दिवसाला प्रती स्व्केअर फुटनुसार ४० रुपये शुल्क आकारले जाते. शुल्क भरल्यानंतरच महापालिकेकडून परवानगी देण्यात येते.

    - माधव जगताप, अतिक्रमण विभाग/ आकाश चिन्ह विभाग प्रमुख

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest