पुण्यात बालगोपाळ, मावळ्यांनी फोडली खेळणी दहीहंडी
पुण्यासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण साजरा केला जात आहे. मात्र, पुणे शहरात एका अनोख्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. बालगोपाळ व छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रीय पारितोषिक विजेता 'मावळा' बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकलेली यावेळी पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलांना कळावेत यासाठी बनवलेल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेम 'मावळा' या खेळाचे जिवंत प्रात्यक्षिक, तसेच ढोल ताशा पथकांच्या बहारदार वादनाने दहीहंडी उत्सवात पार पडली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.