गौरी वनारसे यांनी कसा जपला संबळ वादनाचा वडिलोपार्जित वारसा
मोना येनपुरे
महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य म्हणून संबळ हे वाद्य ओळखले जाते, हे वाद्य देवाचा गोंधळ किंवा नवरात्रीत वाजवले जाते. हे वाद्य पुरुष वाजवत असेल तरी आता हे वाद्य महिला सुद्धा वाजवू शकतात हे आता सिद्ध झाले आहे. पुण्यातील गौरी वनारसे यांनी हे सिद्ध केले आहे.
गौरी या लहान वयापासूनच संबळ हे वाद्य वाजवत आहेत. घरात वडील संबळ वाजवत आणि त्यामुळेच गौरी यांना संबळ वाद्याच आकर्षण निर्माण झाले. वडिलाकडून आलेला हा वारसा गौरी यांनी आजतागायत जपला आहे.
“लग्नाआधी संबळ वाजवायचे. मात्र लग्नानंतर काही लक्ष दिले नव्हते, लॉकडाऊनच्या काळामध्ये मी पुन्हा वाजवायला सुरुवात केली. माझे पती तसेच भाऊ यांच्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे मी पुन्हा एकदा संबळ वाजवायला सुरुवात केली. नवरात्रौत्सवात अनेक ठिकाणी पूजेला बोलावले जाते. तसेच मानसन्मान देखील दिला जातो. प्रत्येक महिलेमध्ये एक कला असते आणि ती कला त्या महिलेने जोपासणे गरजेचे आहे. लोकांसमोर येऊन आपली कला दाखवता येत नसेल तर घरगुती सराव आपला कलेचा सुरू ठेवणे गरजेचे आहे,” असे आवाहन नवरात्रीनिमित्त गौरी वनारसे यांनी महिलांना केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.