कथकली नृत्यातून श्री महालक्ष्मी देवीला नमन
पुणे : 'कथा काहे सो कथक कहवे'... या रामायणातील पौराणिक कथेवर आधारित कथक नृत्याच्या सादरीकरणातून कलाकारांनी श्री महालक्ष्मी देवीला नमन केले. सुंदर अभिव्यक्ती आणि मनोहारी हालचालींमधून कथाकथन सादर करीत कलाकारांनी देवी भक्तांची मने जिंकली.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यावेळी कथकली नृत्याचे कलाकारांनी सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.