भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रेल्वे महिनाभर रद्द
प्रवाशांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रेल्वे गाडी एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे २० मे ते १९ जून २०२३ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने मनमाडमार्गे धावणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (पनवेलमार्गे) ही गाडी दोन्ही बाजूने १९ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११०२५/११०२६ भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी- पुणे - इगतपुरी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर ११०२५ आणि ११०२६ या गाडीचा रेक गाडी क्र. ११११९/१११२० भुसावळ- इगतपुरी-भुसावळ मेमू म्हणून चालविण्यात येणार आहे.
गाडी क्र.११०२५ मेमू भुसावळ येथून रात्री ११.३५ वाजता निघेल आणि इगतपुरीला सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी पोहचेल. नंतर गाडी क्र.११११९ मेमू इगतपुरी येथून सकाळी ९.५५ वाजता निघेल व भुसावळ येथे सायंकाळी पाच वाजून १० मिनिटांनी पोहचेल. गाडी क्र.१११२० मेमू भुसावळ येथून सकाळी सात वाजता निघेल आणि इगतपुरी येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी पोहचेल.
@Central_Railway @RailMinIndia @RailwaySeva Due to technical reasons, Train Nos. 11026/11025, PA - BSL -PA has been cancelled from 20/05/2023 to 19/06/2023. Inconvenience caused is regretted.
— Smt. Indu Dubey (@drmpune) May 19, 2023
नंतर गाडी क्र. ११०२६ इगतपुरी येथून संध्याकाळी पाच वाजून १० मिनिटांनी निघेल व भुसावळला रात्री १० वाजता पोहचणार आहे. इगतपुरीच्या पुढे कल्याण, पनवेल, लोणावळा, पुण्यापर्यंत ही गाडी चालवली जाणार नाही. इगतपुरीत दिवसभर थांबून नियमित परतीच्यावेळी भुसावळकडे प्रवास सुरू होईल. तसेच इगतपुरीपर्यंत धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला नेहमीप्रमाणे बोगी नसतील.