संग्रहित छायाचित्र
पाषाण येथे गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गंभीर अपघात झाला. एका भरधाव आलीशान गाडीने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात सर्वच गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहेत.
पोलिसांनी आरोपी गाडीचालकाला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणी करिता पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
हा अपघात एवढा गंभीर होता की आरोपीच्या गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी जमली होती. पोलिसांनी योग्य प्रकारे परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.