संग्रहित छायाचित्र
पुण्यात गेल्या दोन ते तिन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने नीरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये ठीक आज सकाळी ८ वाजल्यापासून ७५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुण्यासह पिंपरी चिंचचवड आणि जिल्हाभरात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. भोर तालुक्यातील नीरा देवघर प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे धरणातील विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून ७५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी / अधिक बदल होऊ शकतो.
याशिवाय, कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नालापात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग रात्री ९ नंतर ४५० क्युसेकवरून ६०० क्यूसेक करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. खडकवासला कालवा उपविभाग क्र. २ च्या सहायक अभियंता यांनी याबाबत माहिती दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.