संग्रहित छायाचित्र
अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यांत अजूनही पुरेसा पाऊस नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी खालवली आहे. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झाला आहे. पुढील ४ ते ५ दिवस पुणे आणि घाट परिसरातील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील ४-५ दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
16 Jul:पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 16, 2023
मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा.
आज कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस
Must see IMD Updates pic.twitter.com/aupDR4jOMG
पुणे शहर परिसरात येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाट परिसरात प्रवाश करणे टाळावे. तसेच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.