ब्रेक के बाद पावसाची जोरदार बॅटिंग, लवासामध्ये १०५ मिमी पावसाची नोंद
पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. ऑगस्ट महिना पुर्णपणे कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोरदार कमबॅक केल्यामुळे नागरिक सुखावल् आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. लवासामध्ये १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रिय स्थिती ३ सप्टेंबर रोजी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ३ सप्टेंबरनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. तर पुण्यात ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळ्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता.
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. हा केवळ पुण्यातच नव्हे तर कोकण व जिल्ह्यात देखील होत आहे. मगरपट्टा येथे शहरातील सर्वाधिक ५४ मिमी पावसाची नोंद आज सकाळपर्यंत झाली आहे. पाषाण येथे १२.२, लोहगाव येथे ३१.८, चिंचवड येथे ८३.५ आणि बारामती येथे ३५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.