पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द
राज्यभरासह सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे, मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई या दरम्यान धावणाऱ्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. त्यामुळे, आज (१९ जुलै) आणि उद्या (२० जुलै) रोजी डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी या पुणे - मुंबई धावणाऱ्या ट्रेन बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
या ट्रेन राहणार बंद !
डेक्कन क्विन- १२१२३ सीएसएमटी-पुणे १९.७.२३ आणि १२१२४ पुणे-सीएसएमटी २०.७.२३
सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे १९.०७.२३ आणि ११०१० पुणे-सीएसएमटी २०.०७.२३
डेक्कन एक्स्प्रेम- पुणे-सीएसएमटी १९.०७.२३ आणि ११००७ सीएसएमटी-पुणे २०.०७.२३
इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी १९.०७.२३ आणि १२१२७ सीएसएमटी-पुणे २०.०७.२३
इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी १९.०७.२३ आणि २२१०५ सीएसएमटी-पुणे २०.०७.२३
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.