पुण्यातील 'ही' वेगळी राखी तुम्ही पाहिलीत का?
पुण्यातील बेकरीमध्ये एक अनोखी राखी तयार केली जात आहे. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या नक्षीच्या आकाराच्या राख्या पाहिल्या असतील मात्र पुण्यातील एका बेकरीमध्ये चक्क चॉकलेटची राखी तयार केली जात आहे. या राख्यांना सध्या चांगलीच मागणी आहे अशी माहिती बेकरीचे मालक विक्रम मूर्थीयांनी दिली आहे.
बहिण भावाला राखी बांधते मात्र काही वेळानंतर ती राखी पडून जाते किंवा काढली जाते. यामुळे बहिणीने बांधलेले राखी ही राखी देखील असावी आणि तोंडात एक गोडवा निर्माण व्हावा यासाठी ही चॉकलेटची राखी अशी संकल्पना त्यांना सुचली. गेल्या आठ वर्षांपासून ते चॉकलेटची राखी पुण्यात बनवत आहेत. यांच्याकडे तयार होणाऱ्या राख्या साधारण दहा रुपयांपासून ते सर्वात जास्त पन्नास रुपये इतक्या किमतीचा आहेत. दोन-तीन प्रकारच्या चॉकलेट पासून तयार होणाऱ्या या राख्या हातात बांधल्यावर एक तास हातामध्ये राहतात. चॉकलेटची फुले बाहुल्या तसेच वेगवेगळ्या आकारांच्या राख्या त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. यापैकी चॉकलेटची बाहुली असणाऱ्या राखीला सर्वात जास्त मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.