मोबाईलवर आपातकालीन अलर्ट
आज सकाळी अनेक मोबाईल धारकांच्या फोनमध्ये आपातकालीन मॅसेज आला आहे. त्यामुळे वापरकर्ते संभ्रमात पडले आहेत. या मॅसेजेस मागे काही आपली फसवणूक तर होत नाही ना? असा प्रश्न वापरकर्त्यांना पडला आहे. मात्र, ही कोणत्याही प्रकारची फसवणूक नसून तुमच्या सुरक्षेसाठी आणि सावधगिरीचा संदेश तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका, अशा सुचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
सकाळी १० वाजून २० मिनिटांनी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर हा अलर्ट आला आहे. सरकाराने पुण्यात पूर, चक्रीवादळ, भूकंप इत्यादी आपत्कालीन परिस्थितींसाठी वायरलेस अलर्ट सुरू केले आहेत. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे तुम्हाला आपातकालीन परिस्थितीसाठी मदत होणार आहे. धोक्याच्या परिस्थितीबद्दल चेतावणी मिळविण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, यूकेने देखील मार्च/एप्रिल २०२३ मध्ये वायरलेस अॅलर्टची पहिली चाचणी घेतली होती. तेथील संबंधित नागरिकांना अशा प्रकारच्या सुचना करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणयात देखील सरकाराने आपातकालीन अलर्टची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे या अलर्टकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
तुमच्या मोबाईलमधील वायरलेस नोटिफिकेशन्स चालू करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. चाचणी अॅलर्ट्सची सूचना देखील चालू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कारण या दिवसांमध्ये टेस्ट अलर्ट्स चालू होतील. त्यामुळे हे अलर्ट चालू राहण्यासाठी आलेल्या मॅसेजेसला अनुमती द्या, असे सांगण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.