पंतप्रधान मोदींना दाखवला पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटने पार पडले आहे. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
नव्या मेट्रो मार्गामुळे पीसीएमसी ते सिव्हिलकोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे पुणेकरांना शक्य होणार आहे. मेट्रोचे किमान भाडे १० रुपये असणार आहे. तर जास्तीत जास्त भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ प्रवासासाठी ३५ रुपये भाडे लागेल. तर पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल.
पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असेल. तर मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.