३ सप्टेंबरनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होणार, पुण्यात हलक्या पावसाची शक्यता
दक्षिण छत्तीसड येथील वरच्या स्थरापर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच ईशान्य बंगालच्या उपसागरावर चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्या चक्रीय स्थितीपासून कमी दाबाचा पट्टा दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत येतो. याशिवाय, उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय स्थिती ३ सप्टेंबर रोजी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ३ सप्टेंबरनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. तर पुण्यात ३ ते ७ सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळ्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ३ सप्टेंबरनंतर सक्रीय होण्याची शक्यता आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर पुण्यात १ आणि २ सप्टेंबर रोजी आकाश अंशताह ढगाळ राहिल. तसेच मेघगर्जनेसह अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात ३ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबरपर्यंत आकाश सामान्यताह ढगाळ राहून अतिहलक्या ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दरवर्षी ऑगस्ट महिन्या सर्वाधिक पावसाची नोंद होते. मात्र, यंदा ऑगस्ट महिना पुर्णपणे कोरडा गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धरणे अद्याप पुर्ण क्षमतेने भरलेली नाही. त्यामुळे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, आता पुन्हा मान्सून सक्रीय झाल्यानंतर शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.