मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून धावणार !
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुणे मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून धावणार आहे. येत्या १७ ऑगस्टपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मेट्रोतून प्रवास केला होता. या दरम्यान पवार यांनी प्रवाशांशी संवाद साधला. या संवादातून मेट्राची वेळ ही सकाळी लवकर असावी असा सूर उमटला होता. या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोची वेळ सकाळी ६ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सिव्हिल कोर्टपासून सर्व मार्गावर मेट्रो जात आहे.
मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होत असल्याने पुणे स्टेशन येथून मुंबईला जाणारी सकाळची ७.१५ वाजताची डेक्कन क्वीन पकडणे नोकरदारांसह मुंबईला जाणाऱ्यांना शक्य होणार आहे. दरम्यान, मागणी आल्यास मेट्रोची सध्याची रात्रीची कमाल वेळ १० ऐवजी ११ करण्यात येईल असा मेट्रोचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.