Pune News : नियमांचे पालन करा अन्यथा बांधकामे होणार सील

पुणे शहर हवा प्रदूषणात धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात 50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आणि 1 एकरपेक्षा अधिक जागेतील बांधकाम प्रकल्पाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे उभारण्यात यावे.

Pune News : नियमांचे पालन करा अन्यथा बांधकामे होणार सील

नियमांचे पालन करा अन्यथा बांधकामे होणार सील

धूलिकण रोखण्यासाठी स्मॉग गन वॉटर स्प्रिंकलरचा वापर करण्याच्या सूचना

पुणे : पुणे शहर हवा प्रदूषणात धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात 50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आणि 1 एकरपेक्षा अधिक जागेतील बांधकाम प्रकल्पाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे उभारण्यात यावे. धूलिकण रोखण्यासाठी स्मॉग गन वॉटर स्प्रिंकलरचा वापर बांधकामाच्या वेळी करावा अशा मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत.

मुंबईत सध्या सुरू असलेले गृह प्रकल्पांची बांधकामे, मेट्रोचे बांधकाम, वाहनांचे प्रदूषण, हवामानातील बदल आणि फोटोकेमिकल प्रतिक्रिया यामुळे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतच चाललले आहे. त्यापाठोपाठ पुण्यात देखील बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे वाढत्या धूलिकणांमुळे पुण्यात हवा प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. मुंबई, पुण्यासह देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने मार्गदशक सुचना दिल्या आहेत. मार्गदर्शन सूचनांचे पालन न केल्यास बांधकामे थेट सील केली जाणार आहेत. याबाबतच्या सूचना बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणार असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत आदेश काढण्यात आल्यानंतर या उपाययोजना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहिल्या जाणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्यास ही बांधकामे थांबविणे अथवा सील केली जाणार आहेत.

या आहेत मार्गदर्शक सूचना...

 - सध्या असलेली बांधकामे, पाडण्यात येत असलेली बांधकामे आणि प्रकल्पांच्या कामावर ओले हिरवे कापड, ओले ज्यूट कापड अथवा    ताडपत्रीने झाकणे बंधनकारक

- बांधकाम कामगारांना मास्क, गॉगल बंधनकारक

- बांधकामाच्या ठिकाणी माती, खडी, वाळू झाकून ठेवावी

- उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामांच्या ठिकाणी किमान 20 फूट बॅरिकेडिंग ॉ

- राडारोडा टाकल्यास वाहने जप्त केली जाणार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest