हडपसर येथे मालवाहू ट्रकला भीषण अपघात
पुण्यतील हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ भीषण अपघात झाला आहे. लोखंडी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रक दुभाजकाला धडकून पलटी झाला आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकच्या स्टेअरिंग रॉडमध्ये अडचण आली. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्ता दुभाजकावर आदळले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजून करून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.