संग्रहित छायाचित्र
पुण्यातील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पीएमपीएमएल बसच्या मागणीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीचा विचार करून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून गर्दीच्या वेळेमध्ये फेऱ्या देऊन ४ बसमार्गांचा विस्तार करण्यात आला आहे. तर १ बसमार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. तसेच २ मार्गांवर विना वाहक जलद बससेवा आणि ३ बसमार्गांवर नव्याने बससेवा सुरू करण्यात येत आहे. हे सर्व बसमार्ग उद्या म्हणजेच १ सप्टेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.
ही आहेत ४ विस्तारीत बसमार्ग
के-७ : दांगट इस्टेट ते गालिंदे पथ या मार्गाचा विस्तार डेक्कन जिमखाना पर्यंत
मार्ग : वारजेगांव, कर्वेनगर,कर्वेपुतळा, एसएनडीटी कॉलेज
३५ अ : सिमला ऑफिस ते इंदिरा कॉलेज ताथवडे या मार्गाचा विस्तार म.न.पा. भवन पर्यंत
मार्ग : सिमला ऑफिस, पुणे विद्यापीठ, औंधगांव, डांगे चौक
२१६ : भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा या मार्गाचा विस्तार शिवाजीनगर पर्यंत
मार्ग : स्वारगेट, शनिपार, म.न.पा. भवन
३५६ : देहुगांव ते मोशी या मार्गाचा विस्तार भोसरी
मार्ग : मोशीगांव, मोईफाटा, चिखली, तळवडे
१ बसमार्ग पूर्ववत
१०८ : सुतारदरा ते पुणे स्टेशन
मार्ग : शिवतीर्थनगर, डेक्कन कॉर्नर, अ.ब.चौक, फडके हौद
विना वाहक जलद २ बसमार्ग
१२१ क : भोसरी ते म.न.पा. भवन जलद बससेवा (विनावाहक)
मार्ग : लांडेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, वाकडेवाडी
३०१ क : स्वारगेट ते हडपसर जलद बससेवा (विनावाहक)
मार्ग : पुलगेट, रामटेकडी, मगरपट्टा दवाखाना
३ नवीन बसमार्ग
१९६ : स्वारगेट ते जगदंबा भवन, पिसोळी
मार्ग : मुकूंदनगर, मार्केटयार्ड डेपो, कोंढवा, खडीमशीन
३३२ : निगडी ते जांबे
मार्ग : आकुर्डी रेल्वे स्टेशन, वाल्हेकरवाडी, पुनावळे
मेट्रो शटल क्र.३७ : पिंपरी मेट्रो स्टेशन ते किवळेगांव
मार्ग : चिंचवडगांव, धर्मराज चौक, इस्कॉन मंदिर, शिंदे वस्ती, आर्दशनगर, मुकाई चौक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.