PMP News : पीएमपी बसची पासिंग लांबल्याने अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी ऐन दिवाळीच्या सणात अजूनही बस मार्गावर नाहीत ; पीएमपीचे होतेय आर्थिक नुकसान

पुणे: पीएमपीच्या (PMP Bus) बसेसचे आरटीओकडून दरवर्षी पासिंग करुन घ्यावे लागते. हे पासिंग करुन घेण्यासाठी वाहतूकीच्या नियमानुसार बसमध्ये जीपीएस ट्रॅकर (GPS tracker) डिव्हाईस बसणे बंधनकारक आहे.

PMP News

पीएमपी बसची पासिंग लांबल्याने अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी ऐन दिवाळीच्या सणात अजूनही बस मार्गावर नाहीत

पुणे: पीएमपीच्या (PMP Bus) बसेसचे आरटीओकडून दरवर्षी पासिंग करुन घ्यावे लागते. हे पासिंग करुन घेण्यासाठी वाहतूकीच्या नियमानुसार बसमध्ये जीपीएस ट्रॅकर (GPS tracker)  डिव्हाईस बसणे बंधनकारक आहे. परंतु, पीएमपीच्या बसेसमध्ये हे डिव्हाईस बसविण्यात आले नसल्याने तब्बल २१० बसेसचे पासिंग करण्यास आरटीओने नकार दिला होता. त्यामुळे १५ ते २० दिवस बस एकाच जागेर उभ्या होत्या. यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे पासिंगसाठी नेमका वेळ का लागला?, (PMP News) संबंधित अधिकाऱ्यांना जीपीएस डिव्हाईस बद्दल माहिती नव्हती का? तसेच पीएमपीचे झालेले नुकसान कोण भरुन देणार ? याची चौकशी पीएमपी प्रशासनाने करावी, अशी मागणी पीएमपी कामगार संघटनांनी केली आहे. (Pune News)

पीएमपी बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढावी, त्यातून आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी पीएमपीचे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र पासिंग अभावी सुमारे २१० बस एकाच जागेवर उभ्या होत्या. जीपीएस ट्रॅकर डिव्हाईस नसल्याने आरटीओकडून पासिंग केले जात नव्हते. त्यामुळे बसमध्ये जीपीएस बसविण्याचे काम सुरु होते. १५ ते २० दिवसांचा कालावधी गेला. त्यात आरटोओच्या वेळेनुसार बसचे पासिंग केले जात होते. आता पर्यंत २१० बस पैकी १६० बसेच पासिंग झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र अद्यापही अनेक बस मार्गावर न आल्याने कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजा दिल्या जात आहेत. यामुळे कार्मचाऱ्यांचे नुकसान तर होत आहेत. तसेच पीएमपीचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. जर कर्मचारी कामावर आला नाही तर त्याच्यावर थेट कारवाई केली जाते. आता तर तब्बल अनेक दिवस २१० बस एकाच वेळी मार्गावर आल्या नाहीत. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान करावे लागले.  यामुळे ज्या आधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. 

दरवर्षी बसचे पासिंग करावे लागते. त्यामुळेप्रशासनाने बसमध्ये वेळीच जीपीएस बसविणे आपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले होते. दुसरीकडे प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पीएमपीच्या सर्व बस मार्गवार आणण्याच प्रयत्न केल जात आहे पीएमपीला प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसची संख्या आपुरी पडत आहे. असे असताना देखील अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. 

एखादा कर्मचारी कामावर आला नाही तर पीएमपीचे नुकसान झाले, असे सांगत त्याच्यावर कारवाई केली जाते. आता बस नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा दिली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत नाही. ज्या प्रमाणे कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते त्या प्रमाणे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच नुकसान भरपाईची वसूली करावी. कर्मचाऱ्याला बस उपलब्ध नाही तसेच इतर कारणामुळे कामावर जाता येत नसेल तर त्याला पॉईंट ड्युटी देण्यात यावी. तसेत त्याची रजा धरण्यात येऊ नये, असा आदेश पीएमपीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिला होता. त्यामुळे आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा देऊ नये. त्यांना इतर कामे द्यावीत. रजा दिल्या तर कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीचा गंभीरपणे विचार करावा. अशी मागणी केली होती. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला दिसून येत नाही. 

- सुनिल नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन

आरटीओच्या पासिंग अभावी पीएमपीच्या २१० बस जागेवरच उभ्या होत्या. त्यापैकी १६० बसेसचे पासिंग करण्यात आले आहे. उरलेल्या बसचे पासिंग सुध्दा केले  जाईल. आता दिवाळीमुळे आरटी अधिकाऱ्यांना वेळ मिळणे कठीण आहे. बसमध्ये जीपीएस बसविण्यासाठी वेळ लागला. कारण त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवावी लागली.  आरटीओ अधिकाऱ्यांना वेळ मिळेल तसे पासिंग करुन दिले जाणार आहे.  

   - सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest