Climate Change : वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

शहरातील वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, (Cold, cough, fever,) थंडीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कडाक्याची थंडी आणि हवा प्रदूषणामुळे (Air pollution) आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी योग्य आहार आणि काळजी घेतल्यास लवकर बरे व्हाल, असे डॉक्टांरानी सांगितले.

Climate Change

वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

पुणे: शहरातील वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, (Cold, cough, fever,)  थंडीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कडाक्याची थंडी आणि हवा प्रदूषणामुळे (Air pollution) आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी योग्य आहार आणि काळजी घेतल्यास लवकर बरे व्हाल, असे डॉक्टांरानी सांगितले.  

दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची अतषबाजी करण्यात आली. यामुळे प्रदूषणात चांगलीच भर पडली आहे. तसेच पुण्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने हवा प्रदूषीत झाली आहे. त्यामुळे श्वासनाचे आजार होत आहेत. सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असून, दुपारी कडक उन पडत आहे. हे वातावरण सर्दी, खोकला, ताप आणि अपचन यांसारख्या आजारांसाठी पोषक ठरत आहे. यासोबतच अपचनाचे विकार आणि हात-पाय दुखण्यामुळे नागरिक त्रासले आहेत. 

संसर्गजन्य आजार असल्याने घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्याची लागण इतरांना होत असल्याने कुटुंबतच आजारी पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णांना ताप कमी झाल्यानंतरही खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वातावरणाचा त्रास लहान मुलांनाही होत आहे. सर्दी, ताप, खोकला, जुलाब आणि उलट्यांनी मुले हैराण झाली आहेत. त्यामुळे मुलांना थंडीच्या ठिकाणी नेणे टाळावे, आजारी व्यक्तींचा सहवास टाळावा, आजारी असल्यास मुलांना बाहेर फिरु देऊ नये असे आवाहन डॉक्टरांनी केले.

सध्या वातावरणामुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. साधरणतः तीन ते चार दिवसांपर्यंत ताप राहतो. त्यानंतर चार ते पाच दिवस सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. काही रुग्णांना तापानंतर दहा दिवसांपर्यंत सर्दीचा त्रास होतो. तसेच खोकलाच बरा होत नसल्याने रुग्ण त्रासले आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.  वातावरणातील बदलांमुळे अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिंका येतात. सध्या वातारणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. 

शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. असे चित्र असले तरी अद्याप कोणत्या आजाराचे रुग्ण अधिक आहेत, याचा अहवाल आलेला नाही. सामान्य लक्षणे असल्याचे दिसून येत आहे. तरी सुध्दा सर्वांनी काळजी घ्यावी. विनाकारण थंडीत बाहेर फिरु नये.  

 - डॉ. भगवान पवार, आरोग्य विभाग प्रमुख, महापालिका.

वातावरणातील बदल, दिवाळीतील फटाक्यांचा धूर तसेच धुळीमुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. लक्षणे सामान्य असली तरी खोकला लवकर बरा होत नसल्याने रुग्ण त्रासले आहेत. बाहेरचे खाणे टाळावे, भरपूर पाणी घ्यावे. 

 - डॉ. भाऊसाहेब जाधव, जनरल फिजिशियन. 

काय काळजी घ्याल...

- लक्षणे आढळून आल्यास घरगुती उपचार घेऊ शकता, किंवा डॉक्टरांतच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या

- हवा प्रदूषण कमी होई पर्यंत पहाटे थंडीची फिरायला जाणे टाळावे

- योग्य आहारासह भरपूर पाणी प्या

- तोंडाला मास्क लावावा

- गोड, आंबट, तेलकट खाणे टाळावे

- थंडीत जाणे टाळावे

हे लक्षात असू द्या...

 सर्दी, खोकला हे विषाणू जन्य आजार असले तरी साधारणपणे आठवड्यात बरा होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest