संग्रहित छायाचित्र
शैक्षणिक प्रगतीच्या नकाशावर महाराष्ट्र राज्य अग्रेसर होता. परंतु राज्यात परीक्षातील पेपर फुटण्याच्या प्रकारांना आळा घालण्यात राज्यसरकारला यश आलेले दिसत नाही. राज्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचा दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या एमबीबीएस परीक्षांमध्ये चारही पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेपर वेळेवर बदलण्याची नामुष्की आरोग्य विद्यापीठावर आली आहे. पेपर फुटण्याचे प्रमाण वाढत असल्याने आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ई-मेलने प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्याचा ठरविले आहे.
पेपर फुटल्याच्या प्रकारामुळे आरोग्य विद्यापीठाने काही ठिकाणी पुनर्परीक्षा घेतली आहे. फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन्ही प्रश्नपत्रिकांच्या दोन्ही भागांमध्ये हा प्रकार घडल्याने परीक्षा वेळेवर सुरू झाले नाही. गैरप्रकारांमुळे या परीक्षांना होता अर्धा ते पाऊण तास उशिरा सुरू होत असल्याची तक्रार परीक्षार्थी करत आहेत. या सर्वात विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप होतोय. या घडलेल्या घटनांच्या बाबतीत नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आणि गुन्हे शाखेत आरोग्य विद्यापीठाने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विद्यापीठाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, फार्माकॉलॉजी १ या विषयाचा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पॅथॉलॉजी १ विषयाचा पेपरदेखील फुटल्याची माहिती विद्यापीठाला मिळाली. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विद्यापीठाच्या वतीने म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या हिवाळी सत्राची सुरू होती. सोमवारी (२ डिसेंबर) पॅथॉलॉजी २ हा पेपरही लीक झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे तो पेपरही वेळेवर बदलण्यात आला. गेल्या आठवड्यात बुधवारी म्हणजेच ४ डिसेंबरला पॅथॉलॉजी १ विषयाची प्रश्नपत्रिक लीक झाल्याने वेळेवर दुसरी प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि परीक्षा पार पडली. यामुळे परीक्षार्थींना अर्धा ते पाऊण तास प्रश्नपत्रिका उशिरा मिळाली होती.
२ डिसेंबरला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या फार्माकोलॉजी १ या विषयाचा पेपरही लीक झाला होता. ती परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे नंतर जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचा दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्मकॉलॉजी १ या विषयाचा पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पॅथॉलॉजी १ विषयाचा पेपर देखील लीक झाल्याची माहिती समोर येताच आता या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
विद्यापीठाने पेपरफुटी प्रकरणांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती नेमली आहे. या समितीने प्राथमिक तपासात महत्त्वाचे धागेदोरे उघड केले असून, सखोल तपासासाठी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पेपरफुटीमुळे परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विद्यापीठ, महाविद्यालय, आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे कार्यरत असून, पुढील तपास सुरू आहे.
विद्यापीठातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही पेपर लीक होत असल्याने विद्यापीठातच काहीतरी गडबड असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
कशामुळे हा निर्णय घेण्यात आला?
गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षांमध्ये चारही पेपरमध्ये पेपर फुटल्याच्या तक्रारी समोर आल्याने, पेपर बदलण्याची वेळ आरोग्य विज्ञान विद्यापीठावर आली. तर काही ठिकाणी पुनर्परीक्षा घेण्याची वेळ देखील आल्याने आता ईमेल द्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे पेपर लीक झाल्याच्या तक्रारी आल्याने परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकल्या नाहीत आणि विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पेपर लीक झाल्याच्या या गंभीर प्रकरणाची महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने म्हसरूळ पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे.
त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन
त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असली तरी या प्रकारामुळे लष्करी शिस्तीत चालणाऱ्या आरोग्य विद्यापीठात अशी गंभीर चूक कशी घडली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ई-मेलने नवीन प्रश्नपत्रिका पाठवून त्या तातडीने प्रिंटिंग करून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येतील. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या या कालावधीत हा उपक्रम पार पाडवा लागणार असल्याने, यासाठी एक ते दीड तास विद्यार्थ्यांना उशीर होऊ शकतो याविषयी मानसिक तयारीचे आवाहनदेखील विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.
विद्यापीठाची डोकेदुखी वाढली
२ डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात होणाऱ्या एमबीबीएस परीक्षेचा एमसीक्यू स्वरूपातील पेपर परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे एक तास आधी व्हायरल झाला होता. विद्यापीठाला या प्रकाराची माहिती ई-मेलद्वारे मिळताच तातडीने परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यभरातील ५० केंद्रांवर सुमारे ७ हजार ९०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परंतु पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा ताण सहन करावा लागणार आहे. या लिकची माहिती विद्यापीठाला ई-मेलद्वारे मिळाली. ई-मेलच्या स्त्रोताची तपासणी करण्यासाठी आणि संपूर्ण डिजिटल ट्रेलसाठी विद्यापीठ सायबर सेलचा समावेश करण्यात आला आहे. पेपर फुटल्याने विद्यापीठाची डोकेदुखी वाढली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.