PMC : मृत प्राण्यांना दफन करु नका, इन्सिनेरेटर प्लांटमध्ये अंत्यसंस्कार करा – महापालिका

कुत्रा आणि मांजर प्रेमींची संख्या काही कमी नाही. या मुक्या प्राण्यांवर जिवंतपणी जीवापाड प्रेम केले जाते. मात्र त्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या जागेत किंवा सोयीच्या ठिकाणी फेकून अथवा त्याचे दफन केले जाते. यामुळे दुर्गंधी पसरल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.

संग्रहित छायाचित्र

महापालिका प्रशासनाचे आवाहन

 

पुणे : कुत्रा आणि मांजर प्रेमींची संख्या काही कमी नाही. या मुक्या प्राण्यांवर जिवंतपणी जीवापाड प्रेम केले जाते. मात्र त्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या जागेत किंवा सोयीच्या ठिकाणी फेकून अथवा त्याचे दफन केले जाते. यामुळे दुर्गंधी पसरल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. यामुळे महापालिकेवर मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार केले जातात. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून इतर नागरिकांनी देखील पाळीव प्राणी किंवा भटक्या मृत प्राण्यांची माहिती पालिकेला द्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरातील मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून नायडू रुग्णालयाच्या आवारात पाळीव आणि मोकाट प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इंन्सिनेरेटर प्लांट उभारला आहे. या प्लांटवर मृत प्राण्यांची विल्हेवाट लावली जाते. यासाठी महापालिकेकडून पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करायचे असतील शुल्क आकारले जाते. तर भटक्या छोट्या-मोठ्या प्राण्यांसाठी मोफत सुविधा दिली जाते. या सुविधेमुळे प्राण्यांना देखील चांगल्या प्रकारे निरोप देता येऊ शकतो. रस्त्यावर फेकून त्या प्राण्यांची विटंबना करुन नये, असे प्रशासानाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

महापालिकेने २०१८ मध्ये इंन्सिनेरेटर प्लांट उभारला आहे. मार्च ते सप्टेंबर या दरम्यान सुमारे ३ हजार ८७३ पाळीव आणि भटक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार केले आहेत. महापालिका हद्दीतील कुत्रा व मांजर यासाठी दोन हजार रुपये व मोठ्या जनावरांसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येतात. तर भटक्या प्राण्यांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. महापालिकेला यातून मार्च ते सप्टेंबर या महिन्यात १८ लाख २३ हजार ७५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

कुत्रा, मांजर हे प्राणी पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक जण मोकळ्या जागेत किंवा सोयीच्या ठिकाणी फेकून देतात. त्यातील काहीच मोजके महापालिकेला कळवतात. मात्र महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे कमी शुल्क आकारणे आपेक्षित आहे. त्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. 

- निलेश जाधव, प्राणीप्रेमी.

प्राण्याची सुविधा निर्माण केली आहे. मृत्यू प्राणी रत्यावर न टाकता  इंन्सिनेरेटर प्लांट मध्ये देण्यात यावे. महापालिकेकडून २४ तास सुविधा दिली जाते. आरोग्यास विघातक होईल असे कृत्य करू नये.

  - डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका.

 

भटके व पाळीव प्राण्यांवर करण्यात आले अंत्यसंस्कार...

ऑगस्ट- सप्टेंबर - ५९२

सप्टेंबर - ऑक्टोबर  - ४२८

जुलै-ऑगस्ट - ६०२

जून- जुलै - ५५३

मे - जून - ४५२

एप्रिल - मे - ५२३

मार्च- एप्रिल - ७२३

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest