Pune News : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली २६ ‘रुफ टॉप हॉटेल’चालकांना नोटीस

शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बार आणि हॉटेलविरोधात (रुफ टॉप) तीव्र कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची एकत्रित बैठकीत एक समिती नेमण्यात आली आहे.

Pune News : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली २६ ‘रुफ टॉप हॉटेल’चालकांना नोटीस

संग्रहित छायाचित्र

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

पुणे: शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बार आणि हॉटेलविरोधात (रुफ टॉप) तीव्र कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची एकत्रित बैठकीत एक समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २६ ‘रुफ टॉप हॉटेल’चालकांना नोटीस दिली. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

पुणे शहर झपाट्याने पसरत चालले आहे. मोठ मोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. तसेच आयटी क्षेत्राचे देखील जाळे पसरत चालले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत आहे. उंच इमारतीचां फायदा घेवून ‘रुफ टॉप हॉटेल’नावाची बेकायदा संकल्पना राबवून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. उंचावर बसून शहराचे खऱ्या अर्थाने रुप बघत नागरिक आनंद घेतात. मात्र ही संकल्पनाच मुळात बेकायदा असून धोकादायक देखील आहे. त्यामुळे अशा बेकायदा रुफ टॉप हॉटेलांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. याबाबत मुंबईत मुख्यमुंत्री, उपमुख्यंमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी बेकायदा हॉटेलांवर कडक कारवाई करण्यासाठी एक टीम तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार आता याबाबत बैठकीत एक टीम तयार करण्यात आली असून या टीमच्या माध्यमातून शहरातील बेकायदा हॉटेल चालकांवर कारवाई केली जात आहे.

महापालिकेने अशा हॉटेलांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र महापालिकेने कारवाई केल्यानंतर पाठ फिरताच पुन्हा हॉटेल सुरु होत असल्याचे दिसून आले. तसेच रुप हॉटेलमध्ये काही घटना, अपघात घडल्यास नेमकी जबाबदारी कोणाची असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पालिकेकडून ‘रुफ टॉप हॉटेल’चा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांच्या सामुहिक कारवाई करण्यात येत आहे.

शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात हॉटेलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात तब्बल दोन हजाराहून अधिक रुफटॉप हॉटेल आहेत. ही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. त्यामुळे या भागातील नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. वारंवार वाद, विनयभंग असे प्रकार ही या ठिकाणी घडतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रुप टॉप अशी हॉटेलची संकल्पना नसते. त्यासाठी कठोर नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसेच आगीची घटना घडली तर मोठी जीवीताहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांनी महापालिका प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून या हॉटेल्सचे परवाने रद्द करावे. अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.

रुफ टॉप हॉटेलांवर कारवाई करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. २६ बेकायदा हॉटेलांना नोटीस देण्यात आली आहे. नोटीशीला येणाऱ्या उत्तरावरुन पुढील कारवाई केली जाणार आहे.

  - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

नोटीस दिलेल्या रुफ टॉप हॉटेलांची नावे देण्यास टाळाटाळ

महापालिकेच्या हद्दीतील रुफ टॉप हॉटेलांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा हॉटेल व्यवसायास सुरवात केली जाते. असे खु्द्द महापालिका प्रशासनानेच मान्य केले होते. यावरुन महापालिकेच्या कारवाई बड्या उद्योगपतींचे तसेच राजकीय व्यक्तींची असलेल्या हॉटेलांवर महापालिकेचा दरारा नसल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोणत्या हॉटेलांवर कारवाई केली, त्यांची नावे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही टाळाटाळ नेमकी कशासाठी केली जात आहे. हॉटेल चालकांना नेमके कोण पाठिशी घालत आहे, असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest