वाहतूक योद्ध्यांना भेटलात का तुम्ही ?
‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ पुणेने शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेला ‘जरा देख के चलो’ हा उपक्रम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासाठी प्रेरक शक्ती ठरला आहे. वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व आणि रस्त्यावर सुरक्षित असण्याबाबत नागरिकांमध्ये योग्य जाणीव निर्माण करणे हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश होता. रस्त्यावर नागरिकांनी अधिक जागरूक आणि सुरक्षित असावे, यावर ‘जरा देख के चलो’ ने भर दिला. त्याचा परिणाम म्हणून गेल्या महिनाभराच्या काळात वाहतूक कोंडीचे आणि अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे..
कोणताही उपक्रम यशस्वी होण्यासाठी समाजाचा त्यात सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्वयंसेवकांनी शहराच्या वेगवेगळ्या आणि निश्चित केलेल्या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूक पोलिसांच्या खांद्याला-खांद्या लावून काम केले. प्रत्येक नागरिकाने वाहतूक सुरक्षेचे महत्त्व जाणून घेणे आणि त्या दिशेने सुरक्षित राहण्यासाठी पावले टाकणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. ‘जरा देख के चलो’ याच दिशेने उपयुक्त काम करत आहे.