PMC News : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मालमत्ता कर सवलतीचा अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

महापालिकेने (PMC Pune) शहारातील मिळकतदारांना मालमत्ता करात ४० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीनुसार कर भरण्यासाठी महापालिकेकडून पीटी-3 अर्ज दाखल करण्यात येत आहे.

PMC News

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मालमत्ता कर सवलतीचा अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

पुणे: महापालिकेने (PMC Pune) शहारातील मिळकतदारांना मालमत्ता करात ४० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीनुसार कर भरण्यासाठी महापालिकेकडून पीटी-3 अर्ज दाखल करण्यात येत आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. मात्र सततच्या सरकारी सुट्ट्यांमुळे आणि दिवाळी सणामुळे अनेकांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. (Pune News) 

शहरातील ज्या मालमत्तांसाठी ४० टक्के निवासी उत्पन्नाची सूट रद्द करण्यात आली आहे. अशा मालमत्तांवर ही सूट पुन्हा लागू करण्यासाठी पुणेकरांना देण्यात आलेली ४० टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ज्या नागरिकांना ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, त्यांना पीटी-3 फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. त्यासाठी १५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शासकीय व दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे ही मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सोमवारी (ता. १३) महापालिका प्रशासनाकडून याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील सुमारे तीन लाख मालमत्ताधारकांना देण्यात आलेली ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली. परंतु, ही सूट पुन्हा लागू करण्यासाठी आतापर्यंत केवळ ६० हजार नागरिकांनी पीटी-३ अर्ज केला आहे. त्यामुळे अजूनही अनेक नागरिकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ते मुदतवाढीची मागणी करत आहेत. अद्याप २ लाख मालमत्ताधारकांनी अर्ज भरले नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest