दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाची सजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नागपंचमीनिमित्त मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट करण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 22 Aug 2023
  • 10:16 am
Dagdusheth Ganapati  : दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाची सजावट

दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाची सजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नागपंचमीनिमित्त मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सौरभ रायकर, सचिन आखाडे, तुषार रायकर, ज्ञानेश्वर रासने उपस्थित होते.

महेश सूर्यवंशी म्हणाले, “श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीचा सण आहे. त्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शेषाद्री नागाची विशेष सजावट करण्यात आली होती. भारतीय सण उत्सवाच्या परंपरेत नागाला अतिशय महत्त्व आहे. त्यांना शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. सापांविषयी आपल्यामध्ये  करुणा असली पाहिजे.

शेषात्मज गणेश असा गणपती बाप्पांचा पाताळ लोकातील अवतार आहे, असे मुद्गल पुराणात सांगितले आहे. योगविद्या ही शेषाच्या रुपाने प्रकट झाली, हे आपल्याला माहित आहे. शेषाने पतंजली रूपात अवतार घेतला. निसर्गाविषयी आपली सद्भावना असावी. निसर्ग चक्र सुरळीत चालावे यासाठी आपण प्रयत्न करावेत, हा संदेश आजच्या उत्सवातून नक्कीच घेण्यासारखा आहे”, असेही त्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest